ED Seized Money : घोटाळ्यांतून लुटण्यात आलेले ३ सहस्र कोटी पुन्हा गरिबांना देण्यासाठी कायदा करणार ! – पंतप्रधान मोदी यांचे आश्‍वासन !

प्रत्येक घोटाळ्यातील आरोपींकडून जप्त केलेले पैसे संबंधितांना परत केले पाहिजेत आणि यासाठी कायदा होणार असेल, तर जनतेला आनंदच आहे !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !

२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने देशभरातील नेत्यांच्या मुख्य (स्टार) ४० प्रचारकांची पहिली सूची घोषित केली आहे.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर, ९ उमेदवारांची घोषणा !

उमेदवारांची नावे घोषित करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची नावे घोषित !

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्रात १९, २६ एप्रिल, ७, १३ आणि २० मे या दिवशी लोकसभेच्या मतदानासाठी भरपगारी सुटी !

ही सुटी शासकीय आस्थापनांसह सर्व खासगी आस्थापनांनाही असणार आहे. अपवादात्मक स्थितीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवसाची सुटी शक्य नसल्यास मतदान करण्यासाठी त्यांना किमान २ घंट्यांची सवलत दिली जाणार आहे.

Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

संपादकीय : निवडणुकीतून नेमकी कशाची संधी ?

मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !

लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?

देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?