नाशिक येथे तरुणाचा मृत्यू !

नाका-तोंडातून आले रक्त !

नाशिक – येथे १४ एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुलेनगर परिसरात ‘डीजे’ (मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपक) लावण्यात आला होता. नितीन रणशिंगे (वय २३ वर्षे) त्या परिसरात आला असता अचानक त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ‘डीजे’च्या आवाजामुळे त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. तरुणाला इतरही काही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.