Swami Prasad Maurya : मौर्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची श्री नीलकंठ सेवा संस्थानची मागणी !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण

सरकारी कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यास बसपच्या धर्मांध खासदाराचा विरोध !

भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्‍या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

तुम्ही भाजपमध्ये मंत्री असतांना सरकारवर सर्वेक्षणासाठी दबाव का आणला नाहीत ? – मायावती, बहुजन समाज पक्ष

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ‘हिंदूंची मंदिरे पूर्वी बौद्ध मठ होते आणि त्याचे सर्वेक्षण केले पाहिजे’, या विधानावर मायावती यांचा मौर्य यांना प्रश्‍न !

‘डॉ. आंबेडकर जिवंत असते, तर मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असत्या’ म्हणणार्‍या दलित नेत्याला अटक

तेलंगाणामध्ये ‘राष्ट्रीय दलित सेना’ नावाची संघटना चालवणारे नेते हमारा प्रसाद यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या कार्यालयांच्या जवळून बनावट नोटा जप्त

पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.

आम्हाला इच्छामरणाची अनुमती द्या !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती नसल्याने १२ विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांची चढाओढ !

अखिलेश सरकारने मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’ हे नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.

(म्हणे) ‘सोनिया गांधी आणि मायावती यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा ! – काँग्रेस नेते हरिश रावत

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केली.

(म्हणे) ‘ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध असल्याने ती प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही !’ – बसपचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांचा दावा

योगगुरु रामदेवबाबा यांच्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?