
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक विधेयक घाईघाईने आणले आणि ते संमत करून घेतले. हे विधेयक समजून घेण्यासाठी जनतेला अधिक वेळ दिला असता, तर बरे झाले असते, अशा शब्दांत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सरकारवर टीका केली.
2. लेकिन दुःख की बात यह है कि सरकार ने इस बिल को बहुत जल्दबाज़ी में लाकर जो इसे पास कराया है यह उचित नहीं और अब इस बिल के पास हो जाने पर यदि सरकारें इसका दुरुपयोग करती हैं तो फिर पार्टी मुस्लिम समाज का पूरा साथ देगी अर्थात् ऐसे में इस बिल से पार्टी सहमत नहीं है। (2/2)
— Mayawati (@Mayawati) April 4, 2025
१. त्या पुढे म्हणाल्या की, संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांचे म्हणणे ऐकल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की, जर केंद्र सरकारने लोकांना हे विधेयक समजून घेण्यासाठी आणखी थोडा वेळ दिला असता आणि हे विधेयक मांडण्यापूर्वी त्यांच्या सर्व शंका दूर केल्या असत्या, तर ते अधिक चांगले झाले असते.
२. बहुजन समाज पक्ष या विधेयकाशी सहमत नाही. जर सरकारांनी वक्फ कायद्याचा अपलाभ उठवला, तर त्यांचा पक्ष मुसलमान समुदायाला पूर्णपणे पाठिंबा देईल.
३. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले असून ते लवकरच आता राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवले जाईल.
संपादकीय भूमिकावक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ? |