
नवी देहली – जर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत झाले, तर पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयात जाईल आणि विधेयकाला आव्हान देईल. आमची बाजू घटनात्मक तथ्यावर आधारित असल्याने आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यावर व्यक्त केली.
मौलाना महाली पुढे म्हणाले की, मुसलमानांना आशा होती की, नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल (संयुक्त) आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पक्ष या विधेयकाला विरोध करतील; परंतु तसे झाले नाही. जर सर्व पक्षांनी या विधेयकाला जोरदार आणि ठोस तथ्यांसह विरोध केला असता, तर बरे झाले असते.
संपादकीय भूमिकाप्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते ! |