नवी देहली – वक्फ सुधारणा विधेयक उद्या, दुपारी १२ वाजता लोकसभेत मांडले जाणार आहे. १ एप्रिलला झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. या विधेयकावर ८ घंटे चर्चा होईल. तत्पूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही सल्लागार समितीच्या बैठकीत भाग घेतला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आरोप केला की, सरकारविरोधी पक्षांशी संबंधित सूत्रांबद्दल गंभीर नाही, असे सांगत सभात्याग केला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, वक्फ विधेयकावर ८ घंटे चर्चा होईल. आवश्यकतेनुसार वेळ वाढवता येतो. प्रत्येक पक्षाला विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आम्हाला विधेयकावर चर्चा करायची आहे. या सूत्रावर आम्ही सर्व पक्षांशी सखोल चर्चा केली आहे.