अनेक माध्यमांतून भारतीय प्राचीन संस्कृतीचा प्रचार करणार्‍या देहली येथील प्रख्यात ‘इंडोलॉजिस्ट’ प्रा. डॉ. शशिबाला !

प्रख्यात ‘इंडोलॉजिस्ट’ (भारतीय विद्या), ‘भारतीय विद्या भवन’च्या ‘के.एम्. मुन्शी सेंटर फॉर इंडोलॉजी’च्या अधिष्ठाता, देहली येथील भारतीय विद्या भवनच्या मुख्य आचार्य रघु वीरा प्रा. डॉ. शशिबाला या विविध माध्यमांतून भारतीय संस्कृती, येथील प्राचीन शास्त्रे यांचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि संक्षिप्त परिचय येथे पाहूया.

प्रा. डॉ. शशिबाला

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

‘जी २०’ च्या कार्यक्रमात बोलतांना प्रा. डॉ. शशिबाला

१. प्रा. डॉ. शशिबाला यांनी भूषवलेली आणि सध्या भूषवत असलेली पदे

अ. ‘सी २०’ / ‘जी २०’ च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.)

आ. ‘रघुविराच्या ९ खंडांच्या इंग्रजी-संस्कृत शब्दकोशा’च्या संपादिका

इ. माजी सदस्या : मिशन उच्चस्तरीय समिती, भारतीय ज्ञान प्रणाली, शिक्षण मंत्रालय

ई. सदस्या : सोसायटी, मकायस, कोलकाता

उ. अध्यक्षा : आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास परिषद, भारत

ऊ.  प्रा. रघु वीरा यांनी स्थापन केलेली ‘भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय अकादमी’च्या कार्यकारी सदस्या (सध्याचे संचालक प्रा. लोकेश चंद्र आहेत)

ए. सल्लागार : भारतीय संस्कृती वैश्विक न्यास

ऐ. कार्यकारी सदस्या : भारतीय शिक्षण मंडळ (शालेय शिक्षण)

ओ. सदस्या : अनुसंधान प्रकोष्ठ, भारतीय शिक्षण मंडळ

औ. संस्थापक सदस्या : आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ आणि इतर विविध संस्था

अं. राष्ट्रीय संग्रहालय संस्थेतील माजी अभ्यागत प्राध्यापिका

क. इंग्लंड येथील ब्रिस्टल विद्यापिठात अतिथी प्राध्यापक,रशियातील उरल फेडरल विद्यापिठे आणि नवी देहली येथील ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA)’ येथे सल्लागार.

प्रा. डॉ. शशिबाला

२. प्रा. डॉ. शशिबाला यांनी केलेले कार्य

अ. जागतिक स्तरावरील भारताचे सांस्कृतिक योगदान, वैश्विक दृष्टीकोनातून संस्कृत, भारतीय कलांचा इतिहास, बौद्ध धर्म आणि राजकीय सीमांच्या पलीकडे सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.

आ. नवी देहली येथील ‘नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट’ या स्वायत्त विद्यापिठात १५ वर्षे ‘कलेचा इतिहास’ या विषयावर व्याख्याने दिली आहेत.

इ. डॉ. शशिबाला यांनी विविध विषयांवरील २५ पुस्तके आणि ११० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. परिषदा आयोजित करणे, प्रदर्शनांचे आयोजन करणे, परदेशात भारतीय सांस्कृतिक अवशेषांचे दस्ताऐवजीकरण करणे, सर्वत्र प्रवास करून हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे, विविध अभ्यासक्रमांचा मसुदा सिद्ध करून तो सादर करणे, दूरचित्रवाणीवर मुलाखती देणे अशा वेगवेगळ्या माध्यमांतून त्या कार्यरत आहेत. भारतीय विद्या भवनसाठी संस्कृतमधील ‘समग्र विज्ञान आणि भारतीय ज्ञान परंपरा’ यांवर सिद्ध केलेले अभ्यासक्रम ‘ए.आय.सी.टी.ई.’द्वारे (‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’द्वारे) मान्यताप्राप्त आहेत.

३. सन्मान आणि पुरस्कार

डॉ. शशिबाला यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान अन् पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मंगोलियाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘द ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ सर्वोच्च नागरी राज्य पुरस्कार प्राप्त केला.