भारत मुसलमानबहुल देश असता, तर कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता ! – Archaeologist KK Muhammed

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद

नवी देहली – भारत केवळ हिंदु बहुसंख्य देश असल्याने तो धर्मनिरपेक्ष आहे. जर मुसलमान बहुसंख्य असते, तर भारत कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता, असे विधान श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या भूसर्वेक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी केले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. त्यात त्यांनी हे विधान केले आहे. के.के. महंमद यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. सध्या ते भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे सदस्य आहेत. के.के. महंमद यांनी यापूर्वीच मथुरा आणि ज्ञानवापी या वास्तू हिंदूंना परत देण्याचे आवाहन केले होते. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण हे राष्ट्रीय नायक न वाटणारे मुसलमान आदर्श असू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

देशातील तकाथित धर्मनिरपेक्षतावादी हिंदु नेते आणि त्यांचे पक्ष, तसेच अन्य संघटना, संस्था या स्पष्टोक्तीवर तोंड उघडणार नाहीत. कारण त्यामुळे त्यांना मुसलमानांची मते मिळणार नाहीत आणि परदेशातून निधी मिळणार नाही !