Taj Mahal : ताजमहाल सर्वाधिक कमाई करणारे संरक्षित स्मारक !

नवी देहली – भारत सरकारने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांत तिकीट विक्रीतून पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकांमध्ये ताजमहाल हे सर्वाधिक उत्पन्न करणारे स्मारक ठरले आहे.

केंद्रीय संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजमहालने गेल्या ५ वर्षांत अव्वल स्थान मिळवले आहे.