हिंदु युवतीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारलेल्या रोशन अली याने विवाहानंतर पत्नीचे केले बलपूर्वक धर्मांतर !

हिंदु मुलींना मुसलमान बनवण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न केले जात आहेत, त्याचे हे उदाहरण ! धर्मांध मुसलमानांच्या अशा क्लृप्त्यांपासून सावधान !

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

संपूर्ण देशात शहर किंवा एखादा परिसर यांची नावे पालटण्याच्या मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. ‘बाम्बे’चे नाव मुंबई, ‘बेंगलोर’चा उल्लेख ‘बेंगळुरू’, मद्रासचे नाव ‘चेन्नई’ असा करण्यात आले आहे. गोव्यातही नामांतराची ही मोहीम राबवली पाहिजे.

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.

शाहजहापूर  (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ अज्ञातांनी टाकले गोमांस !  

हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना पक्षात प्रवेश दिल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

कादिर मौलाना याने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही, अशी चेतावणी हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिली आहे

बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !

पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्‍या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?

जिहादच्‍या विरोधात लढण्‍यासाठी हिंदूंनी शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्‍या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्‍याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्‍याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वयंबोध म्‍हणजे स्‍वत:चा धर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्‍यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्‍हणजेच शत्रूच्‍या हालचाली समजून घेणे आवश्‍यक आहे.

तिरंग्‍याच्‍या आडून कुणी भगव्‍या ध्‍वजाला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पंतप्रधानांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देश स्‍वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्‍याचार सहन करत आहे. त्‍यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.