तेलुगु चित्रपटातून होणारा देवतांचा अवमान हिंदुत्वनिष्ठांनी रोखला !

‘राजुगारी कोडी पुलाव’ (राजाचा कोंबडा पुलाव) या आगामी तेलुगु चित्रपटामध्ये देवता आणि संत यांच्या करण्यात आलेल्या अवमानाला हिंदुत्वनिष्टांनी विरोध केला. त्यानंतर चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आले असल्याची माहिती निर्मात्याने दिली.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान महाकालच्या पालखी यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांवर छतावरून थुंकणार्‍या ३ मुलांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी सोलापूर, लातूर, बीड आणि तुळजापूर (जिल्‍हा सोलापूर) येथे झालेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनां’त करण्‍यात आली.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ ! – नितीन शिंदे, माजी आमदार

आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले.

अखिल भारत हिंदु महासभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार !

‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

कराड येथील श्री उत्तरालक्ष्मी मंदिराच्या मिळकतीवर वक्फ बोर्डाचा डोळा !

श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

कर्नाटकमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.