हरदोई (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादचे वेगळे प्रकरण समोर !
हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे लव्ह जिहादचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. रोशन अली नावाच्या एका मुसलमान युवकाने देहली येथे एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला. तिने विवाह करावा, यासाठी अली याने हिंदु धर्म स्वीकारल्याचे नाटक केले आणि हिंदु परंपरेनुसार तिच्याशी विवाह केला. विवाहाच्या दोन मासांनंतर तो तिला त्याच्या उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यात असलेल्या रामपूर या गावी घेऊन गेला. (रामपूर नावाच्या गावात असे ‘रावण’ प्रवृत्तीचे लोक रहात आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक) तेथे तिला बलपूर्वक इस्लाम स्वीकारायला लावून तिच्याशी निकाह (मुसलमान पद्धतीनुसार विवाह) केला. यावरून स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली असून रोशन अली आणि त्याच्या परिवाराला अटक करण्याची मागणी केली आहे.
Unique case of love jihad that happened in India
Roshan Ali was living in Delhi.
He was selling flowers for a living.
He met a Hindu woman and wanted to marry her.
~So he introduced himself as Roshan Lal to the girl’s family members.
When the family came to know that he is a… pic.twitter.com/IemShevPn9— Pamela Goswami (@pamelagoswami9) July 9, 2023
देहली येथे फुलांचा व्यवसाय करणार्या रोशन अलीने स्वत:ची ओळख रोशन लाल असे सांगून येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचा विवाह करायचे ठरले; परंतु रोशन लाल हा मूलत: रोशन अली असल्याचे लक्षात आल्यावर युवतीच्या कुटुंबियांनी त्यास विरोध केला. यावरून रोशन अलीने येथील आर्य समाज मंदिरात जाऊन हिंदु धर्म स्वीकारला आणि रोशन लाल नाव धारण करून युवतीशी विवाह केला. नंतर हरदोई जिल्ह्यातील गावी आणून पत्नीला इस्लाम स्वीकारायला लावला. पीडित हिंदु कुटुंबाने बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने पोलिसांत रोशन अलीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|