गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

‘गुरु-शिष्य परंपरा’ हीच भारताची खरी ओळख; मात्र या वर्षी दळणवळण बंदीमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना ५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे प्रत्यक्ष सोहळ्यांचे आयोजन करता आले नाही. असे जरी असले, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले. यातील काही निवडक अभिप्राय पुढे देत आहोत.  

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450042.html

२०. सौ. नेत्रा तनपुरे

‘आताच्या परिस्थितीत हा कार्यक्रम बघता आला. त्यामध्ये सहभागी होता आले’, यासाठी संस्थेला धन्यवाद ! आताचा काळ पुष्कळ वाईट आहे. या काळात गुरूंच्या चरणांचे दर्शन झाले. त्यामुळे मला आनंद झाला. या कार्यक्रमाने मनात येणारे वेगवेगळे विचार आणि चिंता या सर्वांचा विसर पडला. त्याहून आणखी सुखद अनुभव, म्हणजे गुरूंचे दर्शन ! मी पुष्कळ वर्षांनी गुरूंना पाहिले. असे वाटतच नव्हते की, ते दूर आहेत आणि आपल्याशी संवाद साधत आहेत. ‘जणूकाही आपण त्यांच्या समवेतच आहोत’, असे जाणवत होते. तो अनुभव पुष्कळ सुंदर होता. माझे मन पूर्णपणे शांत झाले आणि आताच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मला बळ मिळाले.’

२१. श्री. बाळकृष्ण सुर्वे

‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘पुढील आयुष्य कसे जगावे ?’, हे मला शिकायला मिळाले.’

२२. विद्या देवानंद नाईक

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्वभावदोष-निर्मूलनावरील मार्गदर्शन आवडले. आम्हालाही स्वभावदोष न्यून करायचे आहेत. त्यामुळे मी त्याविषयीच्या ग्रंथाची मागणीही दिली.’

२३. सौ. आरती लोकरे

‘मला गुरुपूजन पुष्कळ आवडले. पूजनाची मांडणी, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले भावपूर्ण पूजन पुष्कळ आवडले. ‘त्या कोण आहेत ?’, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.’

२४. सौ. कामिनी लोकरे

‘कार्यक्रम पहात असतांना माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. आमच्या आईलाही चैतन्य मिळाले. तिला सतत जांभया येत होत्या. घरातील सर्व जणांनी एकाग्रतेने आणि शांततेने हा सोहळा पाहिला. आपत्काळात साधना करण्याचे महत्त्व समजले. हा कार्यक्रम ऐकून आई म्हणाली, ‘‘आपण सर्व जण एकत्र बसून प्रतिदिन नामजप करूया.’’

२५. सौ. मनीषा परुळेकर

‘सोहळा भाव जागृत करणारा आणि चैतन्यमय असा होता. गुरुप्रतिमेचे पूजन, आरती आणि कृतज्ञता व्यक्त करणारे गीत, हे सर्व मला अनुभवायला मिळाले.’

२६. श्री. चंद्रकांत काळे (विज्ञापनदाते)

‘उत्सव पुष्कळच छान होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रश्‍नोत्तररूपी चर्चा पुष्कळ आवडली. त्यातून ‘घराचा आश्रम करायला पाहिजे आणि नामजप केला पाहिजे’, हे शिकलो. आता ६० टक्के आध्यात्मिक पातळी होण्यासाठी मी प्रयत्न करणार.’

२७. सौ. स्मिता जोशी (वाचक)

‘अतिशय सुंदर कार्यक्रम होता. विशेषतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधक साधे आणि नेहमीचेच प्रश्‍न विचारत होते; पण तेवढ्याच शांतपणे अन् हसत परात्पर गुरु उत्तर देत होते. परात्पर गुरुदेव किती महान आहेत ! मी त्यांना प्रथमच पाहिले. प्रवचनात युद्धस्थिती आणि भीषण काळ यांचे वर्णन ऐकले. ‘भगवंत साधकांचे रक्षण करणारच आहे; म्हणून साधना करणे आवश्यक आहे’, हे मला यातून शिकायला मिळाले. मी बर्‍याच जणांना मुंबईत भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘साधना करा. भीषण काळ येणार आहे आणि वर्ष २०२३ नंतर चांगला काळ येणार आहे.’’

२८. सौ. पालवी साकरे

‘मला गुरुप्रतिमेची पूजा पुष्कळ आवडली. ‘धन्य धन्य झाले’, असे मला वाटले. शिल्पाताई (पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर) परदेशात असतात आणि साधना करतात. ‘कुठेही असलो, तरी साधना करून घराचा आश्रम बनवू शकतो’, हा भाग पुष्कळ आवडला.’

२९. सौ. सीमा गोडसे (जिज्ञासू)

‘परात्पर गुरूंचे पुष्कळच अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. त्यात त्यांनी स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व पुष्कळ छान आणि सोप्या भाषेत समजावले. मला वाटत होते, ‘जणूकाही ते आमच्याच प्रश्‍नांची उत्तरे देत आहेत.’ ‘साधनेचा आरंभ हा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करूनच करायला हवा, तसेच तेच प्रक्रिया करवून घेत आहेत’, असे जाणवले.’

३०. श्री. रवि मौर्या

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्कळच चांगले होते. ‘त्यांनी सांगितलेल्या थोड्या जरी गोष्टी जीवनात आचरणात आणल्या, तरी पुष्कळच आध्यात्मिक लाभ होईल’, असे वाटले.’

३१. श्री. सचिन धुमाळ

‘गुरुदेवांचा कार्यक्रम बघतांना पुष्कळ छान वाटले. बर्‍याच प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. आनंद मिळाला. ‘साधनेला आरंभ करायला पाहिजे’, असे वाटून दत्त आणि कुलदेवता यांचा नामजप करायला आरंभ केला. तसेच ‘सोशल मिडिया’द्वारे धर्मप्रसाराची सेवा करण्यास आरंभ केला.’

३२. श्री. प्रदीप खेडकर (अमरावती)

‘मी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ऐकत होतो. ज्या क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम चालू झाला, तेव्हापासून माझे डोके दुखणे न्यून झाले. नंतर १० मिनिटांत डोके दुखणे थांबून हलके वाटू लागले. पूर्ण कार्यक्रम संपल्यावर मला पुष्कळ ताजेतवाने वाटत होते. परात्पर गुरु डॉक्टरांचे विचार ऐकल्यावर माझ्यातील स्वभावदोष काढून टाकायचा  मी संकल्प केला, तसेच सनातन संस्थेसाठी शक्य होईल, तेवढी सेवा देण्याचा संकल्प या गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वावर मी करत आहे.’

३३. सौ. सीमा श्रीपाद जोशी (नागपूर)

‘मी आणि माझे पती दळणवळण बंदी (लॉकडाऊन) चालू झाल्यापासून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतो.आम्ही नामजपाला आरंभ केला.

३४. श्री. विजय पाटील (मुंबई)

‘परात्पर गुरु डॉ. आठवलेजींचे मार्गदर्शन सर्वांना आवडले. परात्पर गुरु डॉक्टरांनी व्यवहारातील सोपी सोपी उदाहरणे देऊन छान शंकानिरसन केले.

एका कुटुंबातील तरुणी आपल्या बाळाला घेऊन आली होती. ‘बाळाकडे लक्ष देतांना साधनेकडे दुर्लक्ष होते’, असे तिचे म्हणणे होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी पुष्कळ छान सांगितले, ‘‘बाळाचे नीट संगोपन करणे’, ही साधनाच आहे.’’

३५.  सौ. श्रद्धा नारकर (मीरा रोड)

‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली प्रत्येक कृती आपल्यासाठीच आहे आणि ते सगळे प्रश्‍न आपलेच आहेत. परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन, म्हणजे आपल्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर आहे’, याची मला जाणीव झाली. ‘घडून गेलेल्या घटनांचा विचार करणे किंवा ‘पुढे काय होईल ?’, याचा विचार करण्यापेक्षा ‘ते दोन्ही काळ भगवंतावर सोडून देणे आणि वर्तमानकाळात आनंदी जीवन जगणे कसे सोपे आहे ?’, हे समजले. त्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.’                     (समाप्त)

गुरुपौर्णिमा २०२० च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितलेली ‘भावी आपत्काळात हिंदूंचे कर्तव्य आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील माहिती ऐकल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. श्री. पवार

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी हिंदु राष्ट्र निर्माण करण्याविषयी जी माहिती सांगितली, ती फारच महत्त्वाची होती. त्यांचे विचार मला पुष्कळच मोलाचे वाटले आणि ते ऐकून समाधान वाटले.’

२. श्री. श्रीकांत ठाकूर आणि सौ. शिल्पा ठाकूर (डोंबिवली)

‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. सद्गुरु नंदकुमारजी जाधव यांचे ‘भावी आपत्काळात हिंदूंचे कर्तव्य आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील व्याख्यान साधकांचा आत्मविश्‍वास वाढवणारे होते.’

३. डॉ. सोनल भट (डोंबिवली)

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आगामी आपत्काळाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. ते खरोखरच सर्वांना सावध करणारे आहे. कार्यक्रम सर्वांगसुंदर होता. धन्यवाद !’

४. श्री. सचिन धुमाळ

‘सद्गुरु जाधवकाकांचा कार्यक्रम बघतांना आपत्काळाविषयीची सगळी सूत्रे कळली.’

५. सौ. सीमा श्रीपाद जोशी (नागपूर)

‘सद्गुरु जाधवकाका आणि सौ. क्षिप्राताई जुवेकर पुष्कळ छान समजावून सांगतात. त्यामुळे ठाऊक नसलेल्या पुष्कळ गोष्टी कळल्या. गुरुपौर्णिमेला सद्गुरु जाधवकाकांनी जे सांगितले, ते मला पुष्कळ पटले. ‘यापुढे येणारा काळ, त्यात घ्यायची काळजी’, याविषयी त्यांनी पुष्कळ छान सांगितले. त्यामुळे ‘नामजपात वाढ करायची आणि स्वतःत पालट करायचे’, असे मी ठरवले आहे.’