धनबाद (झारखंड) येथे प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदन अन् ‘ऑनलाईन’ बैठकीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे प्रबोधन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची मोहीम

धनबाद (झारखंड) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘‘व्हॅलेंटाईन डे’मुळे होणार्‍या हानीविषयी युवकांचे प्रबोधन करण्यासाठी महाविद्यालयांना निर्देश द्यावे’, अशी मागणीही करण्यात आली. या प्रसंगी समितीचे सर्वश्री अमरजीत प्रसाद, विकास सिंह आणि सौ. मोना प्रसाद उपस्थित होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ बैठक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. सुमंत देबनाथ म्हणाले, ‘‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्‍चात्त्य कुप्रथेला थांबवण्यासाठी अनेक वर्षांपासून काही समाजसेवी संघटना युवकांपुढे ‘मातृ-पितृ पूजनदिन’ हा पर्याय ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘मातृ-पितृ पूजनदिन’ या उपक्रमामुळे आई-वडिलांना सन्मान देण्याची भावना वाढीस लागते. त्यामुळे या उपक्रमाला प्रोत्साहन दिले पाहिजे.’’ या बैठकीला समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे उपस्थित होते.