कोल्हापूर आणि सांगली येथील प्रसिद्ध केबलवाहिन्यांनी घेतल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती !

लक्षावधी हिंदूंपर्यंत ‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा आणि हिंदु संस्कृतीचे महत्त्व यांचा व्यापक प्रसार

‘बी न्यूज’वर मुलाखत देतांना श्री. किरण दुसे (डावीकडे)

कोल्हापूर/सांगली, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ ! या विकृत संकल्पनेविषयी समाजात व्यापक जागृती व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर येथील प्रसिद्ध ‘बी न्यूज’ केबलवाहिनी आणि सांगलीतील ‘सी न्यूज’ (सांगली मीडिया कम्युनिकेशन) केबलवाहिनी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच मुलाखती घेतल्या. कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले. या माध्यमांतून लक्षावधी हिंदु जनतेपर्यंत हिंदु धर्मावरील या आघाताचा विषय परिणामकारकपणे पोचण्यास साहाय्य झाले.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा प्रतिपादणारी ‘बी न्यूज’वरील मुलाखत

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा प्रतिपादणारी ‘सी न्यूज’वरील मुलाखत