शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.

लोकप्रतिनिधींना घरे बांधून देण्याऐवजी जनतेच्या विकासासाठी पैसा व्यय करावा !

लोकप्रतिनिधींना खरोखरच मोफत घरांची आवश्यकता आहे का ? कि ही घरे त्यांच्या पाहुण्यांसाठी बांधण्यात येणार आहेत ? राज्य आणि देश कर्जबाजारी आहे. मग अशा घरांसाठी पैसा कुठून आणणार ?

कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणाऱ्या या सोहळ्यात सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले !

दैनिक ‘सनातन प्रभात’ची चातकाप्रमाणे वाट पहाणारे वाचक !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमचे आत्मबळ आहे. ‘उद्या दैनिकात काय वाचायला मिळेल ?’, याची मी चातकाप्रमाणे वाट पहात असते. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. शीतल शशिकांत दाभोलकर, नेरुल, पणजी, गोवा.

मुंबई येथील काही हितचिंतक, धर्मप्रेमी आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक यांचे मनोगत !

सनातनचे साधक ‘पुढे आपत्काळ येणार आहे’, असे सांगायचे. तो आपत्काळ आता या दळणवळण बंदीच्या काळात खरोखर दिसून येत आहे. ‘अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तू, ‘इलेक्ट्र्रिशियन’, अशी ज्यांची आपल्याला नेहमी आवश्यकता भासते, ते मिळत नाही’, हे आम्ही अनुभवत आहोत.’

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणार्‍या जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू करण्यात आलेली ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ ही जिज्ञासूंसाठी बोधामृत ठरली आहे. याविषयी मुंबई, नवी मुंबई आणि डोंबिवली येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सव यांविषयीची माहिती शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना सांगणारे श्री. संतोष वर्तक !

‘‘हे दैनिक राष्ट्र, धर्म, देवता यांविषयीच्या माहितीचे ज्ञानभांडार आहे. यातील वृत्ते वस्तूनिष्ठ असतात. अभ्यासक्रमात शिकवले न जाणारे राष्ट्र-धर्म विषयीचे मार्गदर्शन यातून मिळते. आजच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम जागृतीचे कार्य दैनिक करत आहे.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी मान्यवर काय म्हणतात ?

‘सनातन प्रभात’मध्ये ‘आम्ही काय करतो ? आणि आम्ही काय करायला हवे ?’ याची दिशा मिळते. ‘सनातन प्रभात’ हे भग्वद्गीतेप्रमाणे दिशादर्शनाचे कार्य करत आहे. ती दिशा घेऊन हिंदुत्वनिष्ठ कार्य करत आहेत.

हिंदूंनो, आंतरिक दिवाळी साजरी करूया !

आंतरिक दिवाळी म्हणजे मनमंदिरातील दिवाळी ! मनमंदिरात ज्ञानाचे दीप लावणे आणि स्वतःचे नरकासुररुपी दोष अन् रावणरुपी अहं घालवणे, भावाच्या रांगोळ्या घालणे, प्रीतीची मिठाई वाटणे, सर्व देवतांना आपल्या हृदयसिंहासनावर स्थापन करणे, भक्तीचे कंदील लावणे, मन आनंदी आणि निर्मळ ठेवणे, म्हणजेच आंतरिक दिवाळी !

‘मी केले’, ‘मी विनामूल्य देतो’, असे निर्मात्याने कधी म्हटले आहे का ?

अध्यात्माची शिकवण ज्याने घेतली, तोच खरा ज्ञानी ! हे ब्रह्मांड, हे विश्व, हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे. तो मालक आहे. तो सर्वांनाच सर्व काही म्हणजेच हवा, पाणी, अन्न विनामूल्य देत आहे, तरीपण तो परमात्मा ‘मी केले’, असे कधीही म्हणत नाही.