काशीतील ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वेश्‍वर मंदिर प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा पक्षकार बनवण्यासाठी अर्ज

मंदिर पक्षकारांकडून ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी !

प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्‍वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील

ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या ‘टूलकिट’मध्ये शेतकरी आंदोलनामागे खलिस्तान्यांचा हात असल्याची माहिती

भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !

इराणकडून पाकमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून २ इराणी सैनिकांची सुटका

भारत-पाक युद्धातील अनेक सैनिक पाकच्या कारागृहात खितपत पडले आहेत, कुलभूषण जाधव यांनाही पाकने कारागृहात डांबून ठेवले आहे. याविषयी भारतानेही आता चर्चा करत वेळ दवडण्यापेक्षा अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करणे इष्ट !

‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे.

कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात देहलीमध्ये गुन्हा नोंद

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात ढवळाढवळ करणार्‍यांना वचक बसेल, अशी कृती भारत सरकारने केली पाहिजे !

एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि आणि एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?

भारतद्वेषाचा ‘पुळका’ !

राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.

एम्.आय.एम्.चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचा आदेश

एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी.