शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही हिंदुद्वेष्ट्यांनी येथील मंदिरातील शिवलिंगाची तोडफोड करून ते नाल्यात फेकून दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. हिंदु संघटनांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोचले. मंदिराची हानी करणार्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदु संघटनांनी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोचून दुभंगलेले शिवलिंग कह्यात घेतले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हिंदु संघटनांसह येथील व्यापारी वर्गानेही या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नगरोटा बाजारपेठही बंद ठेवण्यात आली.
संपादकीय भूमिकाहिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना कशी घडते ?, असा प्रश्न निर्माण होतो ! |