वणी (यवतमाळ) तालुक्यात आत्महत्या केलेल्या १२७ शेतकर्‍यांपैकी ३१ शेतकर्‍यांनाच शासकीय साहाय्य !

१२७ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांपैकी १०३ जणांनी विषप्राशन केले, १९ जणांनी गळफास घेतला आणि बाकीच्यांनी पाण्यात बुडून आयुष्य संपवले

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची वाढती आकडेवारी 

कर्ज देत रहाणे हा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरील कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. अन्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

शेतकर्‍यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.

शफेपूर (संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासकीय उपाययोजनांसाह त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. मनोबल केवळ साधना केल्यानेच वाढणार आहे. यासाठी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे हे दर्शवणारी ही घटना !

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्राधान्य देणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.

टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्‍याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.

भारतद्वेषाचा ‘पुळका’ !

राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.

पॉर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अमेरिकेत होणारा वर्णद्वेषी अत्याचार, काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार यांवर हे ‘मान्यवर’ तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

माझ्या आत्म्यात अजूनही भाजप आहे; मात्र गरिबाचे कुणीही काम केले नाही ! – शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

देशातील शेतकर्‍यांचे किंवा गरिबांचे शासनदरबारी काम केले जात नाही, त्यांना साहाय्य मिळत नाही; मात्र श्रीमंतांना झुकते माप मिळते, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्‍याने त्याला मद्य पाजून मारहाण केली.