ब्रॅम्प्टन (कॅनडा) : येथील महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्यावर दोघा पॅलेस्टाईन समर्थक तरुणांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत पुतळ्यावर पॅलेस्टाईनचा झेंडा लावला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या तरुणांनी तोंड झाकले होते आणि खाली अनेक लोक उभे होते. महाराजा रणजित सिंह यांच्या घोड्यावर एक व्यक्ती कापड बांधतांना दिसली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती कॅनडाच्या पोलिसांना देण्यात असून पोलीस अन्वेषण करत आहेत.
SHOCKING : Pro-Palestine protesters vandalize Maharaja Ranjit Singh’s statue!
📍 Brampton, Canada
Where’s the outrage from pro-Khalistan Sikhs in Canada? 🇨🇦@Chellaney pic.twitter.com/EdMkL52jy9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 28, 2024
महाराजा रणजितसिंंह १८ व्या शतकात पंजाबचे महाराजा होते. त्यांनी ४० वर्षांच्या कारकीर्दीत इंग्रजांना त्यांच्या साम्राज्याभोवतीही फिरकूही दिले नव्हते.
संपादकीय भूमिका
कॅनडातील खलिस्तान समर्थक शीख आता गप्प का आहेत ? |