आधुनिक वैद्य सुश्रुत घैसास यांनी हलगर्जीपणा केला नाही !

स्त्री रोगतज्ञांच्या संघटनांचे म्हणणे

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत; म्हणून त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्य सुश्रुत घैसास यांच्यावर केला. ‘आधुनिक वैद्य सुश्रुत घैसास यांच्याकडून वैद्यकीय हलगर्जीपणा झालेला नाही. त्यांनी वैद्यकीय दृष्टीने योग्य निर्णय घेऊन कर्तव्य पार पाडले’, असे ‘पुणे स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र संघटने’ने सांगितले आहे. संबंधित गर्भवतीच्या मृत्यूविषयी संघटनेने दु:ख व्यक्त केले, तसेच ‘आधुनिक वैद्यांवर लावलेले आरोप हे अन्यायकारक आणि तथ्यहीन आहेत. ते अनुभवी, तत्त्वनिष्ठ आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘पुणे स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र संघटना’, ‘महाराष्ट्र स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र संघटना’ (ए.एम्.ओ.जी.एस्.) आणि ‘अखिल भारतीय स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र संघटना’ (फॉग्सी) या संस्थांनी आधुनिक वैद्य घैसास यांना पाठिंबा दिला आहे.