तरुणीस बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्याची बळजोरी !
छत्रपती संभाजीनगर – ओळखीतून मैत्री वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी बळजोरीने शारीरिक अत्याचार केले. तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यास प्रवृत्त केले. सर्व प्रकारांना कंटाळून तिने संबंध तोडले. तिची खासगी छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. या प्रकरणी २५ वर्षीय पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार आयुब अमीर पठाण याच्यावर वाळूज एम्.आय.डी.सी. (संभाजीनगर) येथे १९ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडिता ही लोणार (जि. बुलढाणा) येथील असून तिची आणि आरोपीची ओळख वर्ष २०२१ मध्ये गावात झाली. आरोपीने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. २५ जानेवारी २०२५ या दिवशी यात्रेला घेऊन गेला. जातांना गाडीमध्येही बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २६ जानेवारी या दिवशी भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. धर्मांधाने तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त करू लागला. टिकली लावण्यास विरोध करू लागला. तसे करण्यास नकार दिल्यानंतर तो मारहाण करत असत. याला कंटाळून पीडितेने त्याच्याशी असलेले संबंध तोडले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या भावांना जिवे मारण्याची धमकी दिली. भावाच्या भ्रमणभाषवर छायाचित्रे पाठवली. पीडितेच्या फेसबुक, इन्स्टाग्राम खात्यावर अश्लील संदेश पाठवले. पीडितेने परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन झालेली घटना सांगितली. त्यांनी तिला धीर देत पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यास बाध्य केले. हा प्रकार लव्ह जिहादचा असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.