६ धर्मांधांना अटक करून गुन्हा नोंद

राहता (जिल्हा अहिल्यानगर) – ममदापूर (ता. राहता) येथील मुंतजीर कुरेशी याच्या पशूवधगृहावर लोणी पोलिसांनी धाड घातली. त्या वेळी कत्तलीसाठी आणलेली १५ गोवंशीय जनावरे आणि १ सहस्र २०० किलो गोमांस हस्तगत करण्यात आले. घटनास्थळावरून मुंतजीर कुरेशी, कैफ खान, अरबाज कुरेशी, हुजेब कुरेशी आणि जावेद पठाण यांना कह्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून लोणी पोलिसांनी मुंतजीर याच्या घरावर धाड घातली. घराच्या बाजूला गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले, तसेच घरामध्ये काही जण गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना दिसून आले. घटनास्थळावरून ७ गायी, ५ गोवंश जातीच्या कालवडी आणि ३ गोवंश जातीची वासरे अशा १५ गोवंशियांची सुटका करण्यात आली. १ सहस्र २०० किलो गोमांस असा एकूण ९ लाख २० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कह्यात घेतलेल्या आरोपींवर विविध कलमांन्वये लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम आहे ! |