
ठाणे, २२ एप्रिल (वार्ता.) – कळवा परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींवरून कळवा पोलिसांनी अन्वेषण करून मुंब्रा येथे रहाणार्या अरबाज मोहंमद जावेद खान (वय २२ वर्षे) आणि आसिफअली सौरभअली शेख (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या नामांकित आस्थापनांच्या ३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य ! – संपादक) या प्रकरणी कळवा पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.