Hafiz Saeed : (म्हणे) ‘जर पाणी थांबवले, तर नदीत रक्त वाहील !’

भारताने सिंधु जल करार रहित केल्यानंतर पाककडून हाफीज सईद याचा जुना व्हिडिओ पुन्हा जाणीवपूर्वक प्रसारित

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुम्ही म्हणता की, तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवाल. काश्मीरमध्ये धरणे बांधून तुम्ही पाणी थांबवाल. तुम्हाला पाकिस्तानचा नाश करायचा आहे. तुम्हाला चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गच्या योजना उधळून लावायच्या आहेत.

आतंकवादी हाफीज सईद

जर तुम्ही पाणी बंद केले, तर आम्ही तुमचा श्वास रोखू. या नद्यांमध्ये पुन्हा रक्त वाहील, अशी धमकी देणारा आतंकवादी हाफीज सईद याचा जुना व्हिडिओ पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून आता पुन्हा जाणीवपूर्वक प्रसारित केला जात आहे. या व्हिडिओद्वारे पाक भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने सिंधु जल करार रहित करण्याची घोषणा केल्यानंतर पाक घाबरला आहे आणि त्यामुळे तो ही धमकी देत आहे.

संपादकीय भूमिका

हे रक्त भारतियांचे नाही, तर पाकिस्तान्यांचे असेल, हे पाकने आता लक्षात ठेवावे !