असे सर्वानन् सर्वत्र हवेत !
जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते.
जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते.
बंगालच्या राजकीय रणधुमाळीने किती खालचा स्तर गाठला आहे. ही लोकशाहीची थट्टाच असून जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करून नव्हे, तर धर्माधारित मते मागून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होणे, हे पूर्णत: निषेधार्हच आहे.
डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !
नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.
हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यातील रस्ते उभारणीच्या कामाचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी जंगलातून आणि चिखलातून १५७ किमी. प्रवास केला आहे.आतापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे स्वतःच्या कपड्यांची इस्त्री मोडून जनतेला भेटण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याने प्रयत्न केले नसतील.
इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.
समान नागरी कायद्याच्या माध्यमातून जनतेला तिचा धर्म, लिंग, जात या आधारांवर नव्हे, तर सर्व समान अधिकार मिळू शकणार आहेत. अल्पसंख्यांक समाजात महिलेला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. असे असतांना या महिलेच्या याचिकेतून धर्मांधतेचा अतिरेक कसा असतो, याचाच अनुभव येतो.
‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे.
आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.