गोव्यातील ज्येष्ठ महिलेकडून ऑनलाईन धमक्यांद्वारे पैसे उकळल्याचे प्रकरण
धाडीमध्ये ५ कोटी रुपये किमतीचा ऐवज घेतला कह्यात

पणजी, २० जुलै (वार्ता.) – गोव्यातील वयोवृद्ध महिलेला अन्वेषण अधिकारी असल्याचे खोटे सांगून अटक करण्याची धमकी ‘आनलाईन’ पद्धतीने देऊन २ कोटी ६० लक्ष रुपये उकळल्याच्या प्रकरणी ‘अंमलबजावणी संचालनालया’च्या(‘एनफोर्समेंट डिरेक्टरेट’च्या – ‘ईडी’च्या) पणजी विभागीय कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. ‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी घालून अनुमाने ५ कोटी रुपयांची रोख रक्कम, परकीय चलन, सोन्याचे दागिने आणि इतर मालमत्ता कह्यात घेतली आहे.
सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्याच्या आधारे या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. ‘ईडी’च्या धाडीत १ कोटी ५० लक्ष रुपये रोख रक्कम, सुमारे २ कोटी रुपये किमतीचे परकीय चलन, १ कोटी ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक ‘टोयोटा फॉर्च्युनर’ वाहन आणि ‘डिजिटल’ उपकरणे कह्यात घेण्यात आली, तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी संबंधित अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अशी केली जात होती फसवणूक तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम प्रथम ‘म्युल’ (बनावट) खात्यांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर ती शेकडो बँक खाती आणि शेल आस्थापनांमधून (‘शेल आस्थापने’ म्हणजे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेली आस्थापने) विविध व्यवहारांद्वारे फिरवून तिचा मागोवा लपवला जात होता. अखेरीस ही रक्कम फॉरेक्स संस्थांमार्फत (परकीय चलनाचा व्यवहार करणार्या संस्थांच्या मार्फत) परकीय चलनात रूपांतरित करून भारताबाहेर पाठवली जात होती.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन