प्रधान यांचे त्यागपत्र देण्याचे प्रकरण
दादरमध्ये ३०० हून अधिक आंदोलक कह्यात
धमेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रासाठी स्वाक्षरी मोहीम

मुंबई – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी देहलीत होणार्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह विविध शहरांत आंदोलन करण्यात आले. कॉकरोच पक्ष, विविध विरोधी पक्ष आणि विद्यार्थी यांनी हे आंदोलन केले. ठाणे, नवी मुंबई, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर, चाकोली (भंडारा), अकोला, अमरावती, शहादा (नंदुरबार), यवतमाळ, बीड, परभणी, छत्रपती संभाजीननगर, वाशिम, कोल्हापूर, जळगाव आणि कुडाळ (सिंधुदुर्ग) या शहरांत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह यांची छायाचित्रे आणि विविध वाक्ये लिहिलेले फलक हातात घेतले होते अन् मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
दादर – दुपारी ४ वाजता चैत्यभूमीवर आंदोलन करण्यात आले. विविध मेट्रो स्थानकांत आंदोलक थांबले होते. पोलिसांचा बंदोबस्त सर्वत्र होता. ३०० आंदोलकांना कह्यात घेऊनही अन्य विद्यार्थ्यांनी चालूच ठेवले होते. ‘मैं नहीं तो कौन बे’ (मी नाही तर कोण) असे लिहिलेले फलक त्यांनी हातात घेतले होते. आंदोलनात उरलेले विद्यार्थी काही बोलत नव्हते; कारण त्यांना सांगण्यात आले होते की, ‘तुम्ही बोललात, तर तुम्हाला कह्यात घेतले जाईल.’ या आंदोलनात तरुणींचा सहभाग अधिक दिसत होता.
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी ‘ही लोकशाहीची क्रूर चेष्टा होत आहे’, असे म्हणून विद्यार्थ्यांना पोलीस मारत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. सरन्यायाधिशांनी विद्यार्थ्यांना उद्देशून झुरळाचा उल्लेख केल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना समाजमाध्यमावरून उपरोधिकपणे ‘धन्यवाद’ म्हटले आहे.
‘‘पेपरफुटीवर प्रधान यांचा त्यागपत्र घेणे हा उपाय नाही. उपाययोजना करणे आवश्यक आहे. वांगचुक यांनी सुधारणा काय करायच्या, याच्या सूचना कराव्यात, नवीन पद्धती काय आणू शकतो, हे सांगावे’’, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे.
नागपूर – वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संविधान चौकामध्ये तरुणांनी आंदोलन केले.
ठाण्यात महाविकास आघाडी, तर नवी मुंबईत एन्.सी.पी.ने आंदोलन केले. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधी पक्षासह सामाजिक संघटनांनी आंदोलन केले.
बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर येथे आंदोलक आणि सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची झाली.
पुणे येथील बालगंधर्व चौकामध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन !

पुणे – येथील बालगंधर्व चौकामध्ये युवक-युवतींनी एकत्र येत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घोषणा देण्यास विरोध केला होता. त्यामुळे काही काळ आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक दिसले.
कम्युनिस्ट पक्ष आणि विद्यार्थी संघटना यांनी येथे आंदोलन केले. सरकारच्या विरोधात ढोलकी वाजवून गाणी म्हणण्यात आली. ‘जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
१. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालूच रहाणार आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत; परंतु ते आम्हाला दमदाटी करत आहेत.
२. ‘भारतमाता की जय’, ‘इन्किलाब जिंदाबाद’ या घोषणा देशद्रोही आहेत काय ?
युवकांनी एखादी घोषणा केली म्हणून काय होते ? त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत.
३. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून तुम्ही (प्रशासन) त्यांना दाबणार असाल, तर ही हुकूमशाही आहे. दुसरा स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा
पुण्यातील ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ (एफ्.टी.आय.आय.) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विद्यार्थी अन् विविध सामाजिक संस्था यांनी देहलीतील जंतर-मंतर मैदानावरून संसदेकडे निघालेल्या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी