जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तासह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा

पुणे – महापालिकेतील विविध विभागांत नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून खोटे लेटरहेड (नाममुद्रित पत्र), शिक्के, वरिष्ठ अधिकार्यांच्या स्वाक्षर्या आणि बनावट नियुक्तीपत्र यांच्या आधारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जेजुरीचे राजेंद्र खेडेकर यांच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील, नमिता बनसोडे यांच्यासह अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी शलाका ढोणे यांनी तक्रार प्रविष्ट केली. आरोपींनी पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत युवक-युवतींकडून पैसे घेतले. त्यांना नियुक्तीची बनावट पत्रे दिली.
४५ लाख रुपयांसह शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती करून त्यांचा उपयोग केल्याचे निष्पन्न झाले. जेजुरीचे राजेंद्र खेडेकर यांनी जारी केलेल्या निवेदनात हे सर्व आरोप फेटाळून लावले. ‘मी स्वत: तक्रारदार असून अनेक पीडितांना पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला, तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खरे आरोपी समोर आणावेत’, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !