मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा मृत्यू

वर्ष १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८ वर्षे) याचा २५ एप्रिल या दिवशी सकाळी ११.४० वाजता नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला.

वर्ष १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोेटांमधील आरोपी अबू बकर याला दुबईत अटक

वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील ‘मोस्ट वॉण्टेड’ आरोपी अबू बकर अब्दुल गफूर शेख याला अन्य एका आरोपीसह दुबईत भारतीय अन्वेषण यंत्रणांनी अटक केली आहे. या बॉम्बस्फोटांतील मुख्य आरोपी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम हा अद्याप फरार आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये हत्या

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची २० सप्टेंबरच्या रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर परिसरात हत्या करण्यात आली.

आरोपी फारूख टकला यास अटक

मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार फारूख टकला यास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दुबईत अटक केली.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या ताहिर मर्चंट याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

मुस्तफा डोसाला महिलेसह प्रवास करण्याची सवलत देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करा !

मुंबई बॉम्बस्फोट कटाचा सूत्रधार असलेल्या मुस्तफा डोसा याच्यासह एका महिलेला रेल्वेने प्रवास करण्याची सवलत देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या विरुद्ध खटला प्रविष्ट करण्याचा विचार करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला.

(म्हणे) ‘मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी मुस्तफा डोसा माझा आदर्श !’

मुंबई येथे येऊन डोसा याला भेटावे, अशी माझी इच्छा होती. मुस्तफा डोसा माझा आदर्श होता, असा धक्कादायक खुलासा अधिवक्त्या पल्लवी पुरकायस्थ यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला सज्जाद अहमद मुघल याने गुन्हे शाखेच्या विशेष अन्वेषण पथकापुढे केला.

अबू सालेम आणि करीमुल्ला खान यांना जन्मठेप, तर अन्य दोघांना फाशीची शिक्षा

सालेम याला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणे आणि पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवणे या दोन्ही प्रकरणी, तसेच बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर स्फोटके उतरवल्याप्रकरणी करीमुल्ला याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF