
अकलूज (जिल्हा सोलापूर) – अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या भव्य मैदानावर पालखी सोहळ्यातील पारंपरिक रिंगण सोहळा अत्यंत भक्तीभावात पार पडला. अश्वांनी घातलेल्या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रो भाविकांनी गर्दी केली होती.

‘याच देही, याची डोळा’ अश्व रिंगण पाहून उपस्थित सहस्रो अकलूजकर, तसेच परिसरातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्याने संपूर्ण अकलूजनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली.

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज सोहळ्याचे सराटी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन यांनी अत्यंत भक्तीभावाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे, तसेच अश्वपूजन करून स्वागत केले.

पालखी रथाचे आगमन होत असतांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जेसीबीमधून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकार्यांनी काही काळ रथाचे सारथ्य केले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान !

सोलापूर – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा नदीत अत्यंत भक्तीभावात आणि सुरक्षितरित्या स्नान पार पडले. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्वयंसेवक यांच्या समन्वयामुळे स्नान सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या ‘श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’तील नीरा स्नान हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
वारकरी संप्रदाय
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !