नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !

डोंबिवली येथील आधुनिक वैद्यांवरील आक्रमणाचे प्रकरण

शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे

ठाणे – डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात आधुनिक वैद्यांवर आक्रमण केल्याप्रकरणी अटक झालेले शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. उच्च न्यायालयाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित होण्याचे आदेश दिले होते. त्यांनी तसे केले. आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी त्यांना कल्याण जिल्हा न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.