सरकारची प्रतिमा मलीन झाल्याचे कारण देत विरोध करणार्याविरुद्ध काँग्रेस सरकारने नोंदवला होता गुन्हा
बेंगळुरू (कर्नाटक) – हत्या करणार्यांवर कठोर कारवाई न करता या हत्येच्या विरोधात ट्वीट करणार्याविरुद्ध गुन्हा नोंदवणे अयोग्य आहे. असे ट्वीट करणार्याच्या मागे लागणारे राज्य सरकार अराजकता निर्माण करत आहे, अशा शब्दांत कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढत ट्वीट करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला स्थगिती दिली.
राज्यातील बंट्वाळ येथे लावण्य या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणी कायद्याचे विद्यार्थी किरण आराध्य यांनी एक्सवर पोस्ट केली होती. ती पोस्ट सरकारची प्रतिमा मलीन करत असल्याचे सांगत कर्नाटक पोलिसांनी किरण आराध्य यांच्याविरुद्ध हायग्राउंड्स आणि बंट्वाळ पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवला होता. तो रहित करण्यासाठी किरण यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम्. नागप्रसन्ना यांच्या एकल पिठाने ही स्थगिती दिली.
किरण आराध्य यांनी एक्स पोस्टमध्ये डाव्या हातामध्ये घड्याळ आणि पायाच्या घोट्यापेक्षा वरच्या भागाची पँट घातलेला माणूस दाखवत ‘बंट्वाळ बस स्थानकात एका तरुणीचा हत्या करणारा राक्षस’, असे लिहिले होते.

Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !