पुरंदवडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडले !

पुरंदवडे येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यात धावणारा अश्व

सोलापूर – आषाढी वारीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण २० जुलै या दिवशी पार पडले. लाखो वारकर्‍यांच्या जयघोषात आणि माऊलींच्या अश्वांची नेत्रदीपक दौड अनुभवत हा चैतन्यमय सोहळा पार पडला. पुरंदवडे येथील रिंगणात माऊलींच्या अश्वाने ३ फेर्‍या पूर्ण केल्यावर हा सोहळा पूर्ण होतो.

आज खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसर्‍या गोल रिंगणाची पत्रिका

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण २१ जुलै या दिवशी खुडूस फाटा येथे होणार आहे. पालखी सोहळ्याचा दुपारचा विसावा धावबावी माऊंट, तर रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे होईल.