युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !

उपस्थितांना संबोधित करतांना पोलीस निरीक्षक शरद मेमाने

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे युवती आणि महिला यांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थित आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते

या प्रसंगी जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर यांनी पाल्यांवर संस्कार कसे करावे ? याविषयी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी ‘यापुढील काळात प्रत्येक महाविद्यालय आणि सामाजिक मंडळे यांच्यासमवेत प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम घेण्यात येईल’, असे सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थित युवती, महिला

हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी ‘लव्ह जिहाद’च्या भयावहतेविषयी उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, महिला आघाडीच्या सौ. ललिता ठाणेकर, सौ. सुनीता हत्तीकर, कु. हर्षिता शेखावत यांसह युवती, महिला उपस्थित होत्या.