बसच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू
मुंबई – भरधाव बेस्ट बसने पादचारी भास्कर पांडे (वय ६५ वर्षे) याला चिरडले. यात त्याचा मृत्यू झाला. अपघातात बसचालक आणि वाहक दोघेही गंभीर घायाळ झाले. अपघातामुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूकोंडी झाली होती.
प्रेयसीकडून प्रियकराची क्रूर हत्या !
संपादकीय भूमिका : हिंसकतेमुळे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याचे दर्शवणारी घटना !
कल्याण – प्रेयसीने प्रियकराच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी स्नानगृहातील नळ तिने चालू ठेवला होता. पाणी घराबाहेर येऊ लागल्याने नागरिकांना शंका आली. कोलकाता येथे गेल्यावर तिने घरमालकाला ध्वनीमुद्रित संदेश पाठवून हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येमागील कारण कळू शकलेले नाही.
चोरलेले १ सहस्र ६६५ भ्रमणभाष हस्तगत
मुंबई – रेल्वे प्रवासात चोरीला गेलेले किंवा हरवलेले २ कोटी ४९ लाख ५ सहस्र रुपये किमतीचे १ सहस्र ६६५ भ्रमणभाष रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले. कायदेशीर पडताळणीनंतर भ्रमणभाष मूळ मालकांना परत करण्यात आले.
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगर परिषदेला ५ कोटी रुपयांचा निधी संमत !
पंढरपूर – पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकर्यांना सोयीसुविधा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ कोटी रुपयांचा निधी नगर परिषदेला उपलब्ध करून दिला. या संदर्भातील आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आले असता प्रशासनाने केलेल्या सुविधांची पहाणी करतांना त्यांना काही सुविधा आणि अडचणी दिसून आल्या. यानंतर त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी तात्काळ ५ कोटी रुपयांचा निधी संमत केला. (वारकर्यांच्या अडचणी लक्षात आल्यावर त्या सोडवण्यासाठी तात्काळ निधी संमत करणारे लोकप्रतिनिधी सर्वत्र हवेत ! – संपादक)

गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !