राज्यात सरासरी वीजदेयक आकारण्याची असलेली पद्धत तात्काळ बंद करावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

घरामध्ये मीटर नसतांना गरिबांना वीजदेयक जाणे चुकीचे आहे. हे राजकीय सूत्र नाही.=विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले

ई-कॉमर्स आस्थापने देशात चिनी साहित्यांची विक्री करतात ! – ‘कॅट’चा आरोप

ई-कॉमर्स आस्थापनांच्या या व्यापारामुळे पंतप्रधान मोदी यांच्या ‘लोकल फॉर वोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळेच या आस्थापनांवर सरकारचा कायदेशीर वचक असणे अतिशय आवश्यक !

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनेत्री कंगना रणावत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडीमुळे चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रणावत यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला.

सातारा शहर शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात शिवतीर्थावर निदर्शने

कोरोनामुळे आधीच सर्व नागरिक डबघाईला आले आहेत. त्यातच ही इंधन दरवाढ नागरिकांना न पेलवणारी आहे.

मनमानी करणार्‍या पुण्यातील खासगी शाळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांचे आंदोलन !

शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्‍या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते.

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार  

मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.

मी घरी बसून विकासकामे मार्गी लावली ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ

सीबीआयच्या कह्यातील ४५ कोटी रुपयांचे १०३ किलो सोने गायब

देशातील एका महत्त्वाच्या सुरक्षायंत्रणेकडून एका संवेदनशील प्रकरणात असा गलथानपणा होत असेल, तर त्याचा एकंदरीत कारभार कसा चालत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! यास दोषी असणार्‍या उत्तरदायींवर कारवाई करणे आवश्यक !

कोरोनामुळे झालेल्या हानीच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाकडून केंद्र सरकारकडे प्रोत्साहन पॅकेजची मागणी

८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी

रूपी अधिकोषातील खातेदारांची १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत यासाठी उच्च न्यायालयात धाव !

ठेवीदारांच्या आर्थिक अडचणींचा विचार करता रूपी अधिकोषाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेतील १ सहस्र १४६ कोटी रुपये परत मिळावेत म्हणून गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.