Amit Shah : निवडणूक रोख्यांना दुसरा पर्याय नसल्याने आताच्या निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होत आहे ! – अमित शहा यांचा दावा

असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याच्या प्रश्‍नावर दिले.

Loksabha Election 2024 : तमिळनाडूत आतापर्यंत १ सहस्र ३०९ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त !

तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे.

Maulana Fazl-ur-Rehman : भारत महाशक्ती बनत आहे, तर पाकिस्तान भीक मागत आहे !

पाकच्या संसदेत मौलाना (इस्लामचा अभ्यासक) फजल ऊर रहेमान याचा पाकला घरचा अहेर !

यंदाच्या गाळप हंगामात उसाच्या गाळपात कोल्हापूर विभाग प्रथम !

साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर असून या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई !

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंदे चालवणार्‍यांना दणका दिला आहे. यासाठी १४ नियमित आणि ३ विशेष ‘भरारी पथके नियुक्त केली आहेत.

तुम्हाला विनाश हवा कि विकास, हे ठरवण्याची हीच वेळ ! – उद्धव ठाकरे

एका बाजूला विनाश, तर दुसर्‍या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचंय ते तुम्ही निवडा, असे आवाहन येथील सहस्रोंच्या सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.  

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निवाडा !

बंगालमध्ये २५ सहस्रांहून अधिक शिक्षक आणि अन्य पदे यांच्या भरतीचा घोटाळा करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने या घोटाळ्याशी संबंधित २५ सहस्र ७५३ शिक्षकांची भरती रहित केली.

Supreme Court On Stridhan : स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे अपवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर भा.द.वि.च्या कलम ४०६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.