वणी (यवतमाळ), २७ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक घटली आहे. नुकतीच चालू झालेली ‘सीसीआय’ची कापूस खरेदी १४ सहस्र क्विंटलच्या खरेदीनंतर ओस पडली आहे. बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्यांची चिंता वाढवत आहे.