मुंबई साखळी बाँबस्फोटातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.

दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा अंगरक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीत माहिती आली समोर

गुंड दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचे उघड !

दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ही माहिती चौकशीच्या वेळी दिली.

प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !

मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !

माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्‍वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी निगडित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिक हे आधी ‘ईडी’ कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते.

पवारसाहेब हेच ‘दाऊदचा माणूस’ असू शकतात ! – आमदार नीतेश राणे, भाजप

पवारसाहेब हेच दाऊदचा माणूस असू शकतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ९ मार्च या दिवशी ‘ट्वीट’ करून केला आहे.

नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झरवळ यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून सरकारला घेरले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.