ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी स्थगिती दिली.

शिवलिंगाला हानी न पोचू देता त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते !

ज्ञानवापीच्या परिसरात आढळलेल्या शिवलिंगाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू न देताही त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयात दिली.

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे.

ज्ञानवापीशी संबंधित सर्व ७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार

ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा न्यायालयाचा आदेश ! शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्‍या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.

रमझान मासात ‘वजू’ करण्याची मागणी : १४ एप्रिलला सुनावणी

काही मासांपूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘वजू’च्या ठिकाणी शिवलिंग सापडले होते. तेव्हापासून ज्ञानवापीत ‘वजू’ करण्याच्या परिसराला टाळे ठोकण्यात आले आहे. 

शिवलिंगाचा वैज्ञानिक अभ्यासाविषयी उत्तर न दिल्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना फटकारले

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, हे प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, विशेषत: त्याविषयी देशात सर्वांचे लक्ष आहे.

ज्ञानवापीप्रकरणी सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्यावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

वाराणसी येथील ज्ञानवापी वादाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्याची मागणी करणारी याचिका सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे. यावर २१ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे वयोमान पडताळण्यावर तात्काळ प्रतिज्ञापत्र सादर करा !

यावर पुढील सुनावणी ५ एप्रिल या दिवशी होणार आहे. न्यायालयाने या वेळी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक वेळ देण्याची मागणी केली जाऊ नये.

(म्हणे) ‘भाजप बाबरीनंतर ज्ञानवापी आणि ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे !’

माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांचा तथ्यहीन आरोप

आवैसी आणि अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा

ओवैसी आणि यादव यांनी एका कार्यक्रमात ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यास न्यायालयाने मान्यता दिली.