वाराणसी – ज्ञानवापीच्या परिसरात असलेल्या व्यासजी तळघराच्या छतावर नमाजपठणासाठी मुसलमानांना प्रवेश बंद करण्याची आणि तळघर दुरुस्त करण्याची हिंदूंची मागणी करणारी याचिका वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने फेटाळली. ज्ञानवापीच्या तळघरात चालू असलेली पूजा नेहमीप्रमाणे चालू राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. हिंदूंच्या याचिकेवर सुनावणी करतांना, मुसलमान बाजूने मांडलेला आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली आव्हान याचिका लक्षात घेऊन न्यायाधीश हितेश अग्रवाल यांनी हा निर्णय दिला आहे.
ज्ञानवापी संकुलाच्या धार्मिक वादाच्या संदर्भात हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सूत्रावर हिंदु-मुसलमान बाजूंमध्ये दीर्घकाळ कायदेशीर लढा चालू आहे. आता तळघर दुरुस्तीविषयी हिंदु पक्षकार जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहे.