ही मागणी मान्य करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘काशी धर्म परिषदे’च्या बैठकीत साधू आणि संत यांनी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे’, अशी मागणी केली आहे.

ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

काशी धर्म परिषदेच्या बैठकीत साधू आणि संत यांनी एकूण २२ ठराव संमत केले. या वेळी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

हिंदूंच्या संतांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्‍या पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ? धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !