Nagpur Riots : नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खान याच्यासह ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खान

नागपूर – येथे झालेल्या दंगलीचा सूत्रधार फहीम खान याच्यासह ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फहीम खान याने जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावर आक्षेपार्ह पोस्ट असल्याचे आढळले आहे. ही खाती बंद करण्यात येत आहेत. या दंगली प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, तरच कुणालाही अशा प्रकारची दंगल करण्याचे धाडस होणार नाही !

दंगलीचे आरोपी नागपूरच्या बाहेरचे !

या दंगल प्रकरणात सहभागी असलेले अनेक आरोपी नागपूरच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ठिकाणाविषयी अन्वेषण चालू आहे. या प्रकरणात हिंसाचार वाढवण्यासाठी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘सर तन से जुदा’ (शिर धडावेगळे करणे) अशा पोस्ट प्रसारित करण्यात आल्या होत्या. अशा पोस्ट प्रसारित करणार्‍यांवरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

नागपूरमध्ये बाहेरून धर्मांध मुसलमान येतात आणि दंगल करून पळून जातात, हे नागपूर पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांचे गोपनीय खाते झोपले होते का ? उद्या नागपूर बाहेरून आतंकवादी आले आणि त्यांनी घातपात केला, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार आहे ?