Pro-Palestine Slogans In Karnataka : कर्नाटकमध्ये नमाजाच्या वेळी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा !

वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात काळ्या फिती बांधून विरोध

शिवमोग्गा (कर्नाटक) – देशभरात ३१ मार्च या दिवशी मुसलमानांनी रमझान सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कर्नाटकाच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील ईदगाह मैदानात नमाजपठणानंतर मुसलमानांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिलेले फलक प्रदर्शित केले. तसेच ‘पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टी यांवरील इस्रायलचे आक्रमण थांबवा’, असे दर्शवणारे फलकही प्रदर्शित केले होते. या वेळी मुसलमानांनी केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात काळ्या फिती बांधून सामूहिक नमाजपठण केले. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांमध्ये ‘एस्.डी.पी.आय.’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

संघ परिवाराचा अवमान करणारे फलक प्रदर्शित !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – हुब्बळ्ळीतील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये रमझानच्या नमाजापठणाच्या वेळी संघ परिवाराचा अवमान करणारे फलक प्रदर्शित करणार्‍या ‘एस्.डी.पी.आय.’ कार्यकर्त्यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (धर्मांध मुसलमान त्यांच्या सणांच्या काळात हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील मुसलमानांना पॅलेस्टाईनविषयी इतकेच प्रेम वाटत असेल, तर सरकारने त्यांना तेथे पाठवण्याची व्यवस्था करावी !