Congress MP moves SC Against Waqf Bill : सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध काँग्रेसच्या खासदाराची याचिका

नवी देहली : संसदेने संमत केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात पहिली याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

जावेद यांचा असा दावा आहे की, हे विधेयक मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करणारे असून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.

द्रमुकही वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार !

यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनीही या विधेयकाला त्यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. २७ मार्च या दिवशी तमिळनाडू विधानसभेने वक्फ सुधारणा  विधेयक मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव संमत केला होता. त्यात म्हटले आहे की, यामुळे धार्मिक सौहार्द बिघडेल, अल्पसंख्यांक मुसलमानांवर त्याचा विपरित परिणाम होईल.