गोवा मांस प्रकल्पात हत्या करण्यासाठी शेजारच्या राज्यांतून पशू आणण्यास नोंदणीकृत दलालांना अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“३० टक्के लोकांसाठी आपल्याला हे करावे लागत आहे”, तर गोव्यातील ७० टक्के हिंदूंच्या भावनांचा तुम्ही कुठेच विचार करत नाही. यापुढे असे चालणार नाही.

बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर पुन्हा आक्रमण

हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्‍या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे !

गोभक्षकांच्या दबावाला शासनाने बळी पडू नये आणि गोवा मांस प्रकल्प चालू करू नये ! – गोव्यातील गोरक्षकांची शासनाकडे मागणी

गोवा शासनाने गोभक्षकांच्या दबावाला बळी पडू नये. उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत चालू करू नये. शासनाने गोव्यातील गोवंशियांसाठी हानीकारक असे कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी गोव्यातील गोरक्षकांनी शासनाकडे केली आहे.

३१ डिसेंबरच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

गर्भारपणाचा बाजार !

सध्या गर्भवती असलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला बिनधोक प्रसिद्धी देऊन त्यांच्यातील स्पर्धा सांभाळत असतात.

भारतियांची नैतिकता रसातळाला ?

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

‘गोवा इन्क्विझिशन’चा रक्तरंजित इतिहास समोर आणण्यासाठी झालेला #GoaInquisition ‘हॅशटॅग’ राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर !

पोर्तुगिजांकडून केल्या गेलेल्या रक्तरंजित इन्क्विझिशनचा इतिहास गोवा मुक्तीदिनानिमित्त समोर आणण्यासाठी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून ट्रेंड करण्यात आला.

पाकच्या सिंध प्रांतात हिंदु तरुणाला मारहाण आणि हिंदु व्यापार्‍यांवर गोळीबार : ३ जण घायाळ

पाकमधील असुरक्षित हिंदू आणि निष्क्रीय मानवाधिकार आयोग अन् भारत !