|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमाच्या विज्ञान विषयाच्या क्रमिक पुस्तकात वैद्यकीय शस्त्रकर्माचे जनक सुश्रुताचार्य यांच्याऐवजी अबू अल कासीमा अल जवाहरी असल्याचे अंतर्भूत करण्यात आले आहे. भारतीय इतिहासात ८व्या शतकात सुश्रुताचार्य नावाचे प्रख्यात वैद्य होऊन गेले होते. त्यांना ‘शस्त्रकर्माचे जनक’ म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे. तरीही १० व्या शतकात होऊन गेलेल्या अबू अल कासीम अल जवाहरी याचा उल्लेख ‘वैद्यकीय शस्त्रकर्माचा जनक’ असा करून विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवण्यात येत आहे.
Kerala state board Class 9 textbook distorts history, claims Abu al-Qasim Al-Zahwari was the ‘Father of Surgery’ instead of Sushruthahttps://t.co/zGiwDlDnUl
— OpIndia.com (@OpIndia_com) January 16, 2021
एन्.सी.ई.आर्.टी.ने नुकताच मोगलांनी युद्धात उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या डागडुजीसाठी निधी दिल्याची माहिती त्याच्या क्रमिक पुस्तकात दिली होती. या माहितीविषयी पुरावा मागितल्यावर त्यांनी तो उपलब्ध नसल्याचे सांगितले होते.
सुश्रुताचार्यांची ओळख
भारतीय इतिहासात सुश्रुताचार्य यांनी त्याच्या ग्रंथात १ सहस्र १२० रोगांची माहिती असलेली १८४ प्रकरणे लिहिली असून त्यात ७०० आयुर्वेदिय वनस्पती, अनेक प्रकारच्या औषधांची माहिती दिली आहे. तसेच त्यात विविध आजारावर आवश्यक असलेल्या शस्त्रकर्मांचा समावेश आहे. |