‘तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’- अभिनेत्री कंगना राणावत यांचा आव्हानात्मक प्रश्‍न

‘तांडव’ वेब सिरीजमध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिंदु कलाकार असतांना केवळ अभिनेत्री कंगना राणावत असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस करतात !  

वेब सिरीज ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ची वेब सिरीज ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचे क्षमापत्र ट्वीट करत ‘तू तुझ्या सिनेमात अल्लाची अशा प्रकारे थट्टा करू शकतोस का ?’ असा प्रश्‍न अभिनेत्री कंगना राणावत यांनी विचारला आहे. हा प्रश्‍न या चित्रपटात प्रमुख भूमिकत असणारे अभिनेते सैफ अली खान यांनाही लागू होतो.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहेे, ‘अली अब्बास  जफरजी, कधी तुम्ही तुमच्या धर्मावर चित्रपट बनवला आणि त्यानंतर त्यासाठी क्षमा मागितली का ? सगळ्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आमच्याच धर्माला का ? कधी स्वतःच्या एकमेव देवाची थट्टा उडवून त्याविषयीही क्षमा मागा. तुमच्या गुन्ह्यांचा हिशोब भारताचा कायदाच करेल. ते दृश्य मागे घ्या.’

कपिल मिश्रा यांचे हे ट्वीट ‘टॅग’ करतांना कंगना राणावत म्हणाल्या, ‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते (धर्मांध) थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’

यापूर्वी कंगना राणावत यांनी अन्य एका ट्वीटमध्ये लिहिले होते की, ही गोष्ट फक्त कन्टेंटची नाही. हे रचनात्मकदृष्ट्याही तितकेच वाईट आहे. दृश्यामधील प्रत्येक गोष्ट आक्षेपार्ह आहे. यासाठीच विवादास्पद दृश्य ठेवले गेले.

‘तांडव’ वेब सिरीजमध्ये पहिल्या भागातील १७ मिनिटांनंतर शंकर आणि श्रीराम यांचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण केले आहे. यानंतर वेब सिरीजवर बंदी आणण्याचीही मागणी करण्यात आली. वाद वाढत असतांना दिग्दर्शक अली अब्बास जफर याने क्षमायाचना केली आहे.