नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनानंतर नमाजपठण घरी करण्याचे मशिदीतून आवाहन

येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.